सांगलीत क्रूरतेचा कळस!

माधवनगर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून फिरणाऱ्या एका वळूवर कोणीतरी कुन्हाडीचे वार केले. घाव बसताच वळू उधळला. पण, वार खोलवर झाल्याने कुऱ्हाड त्याच्या शेपटीजवळ मांडीतच रुतून बसली. अडकलेली कुऱ्हाड आणि सांडणारे रक्त यासह तो गावभर फिरत होता. अखेर प्राणिप्रेमींनी त्याला बेशुद्ध करून कुन्हाड काढली. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या हल्ल्याचा प्राणिप्रेमींनी निषेध केला. संबंधितावर कारवाईसाठी संजयनगर पोलिस ठाणे गाठले. माधवनगर परिसरात हा वळू जखमी अवस्थेत फिरत असल्याची माहिती नागरिकांनी प्राणिमित्रांना दिली.

बराच रक्तस्त्राव झाल्याने तो अशक्त झाला. ॲनिमल राहतच्या मदतीने उपचार अॅनिमल रेस्क्यू पथक आणि अॅनिमल राहतच्या सदस्यांनी त्याच्यावर उपचारासाठी पावले उचलली. कुन्हाड खोलवर जाऊन अडकल्याने ती काढणे मुश्किल होते. त्यासाठी वळूला बेशुद्ध करणे गरजेचे होते. ॲनिमल राहतच्या पशुवैद्यांनी त्याला भूल दिली.

तो बेशुद्ध झाल्यानंतर कुन्हाड बाहेर काढली. होता. कुन्हाड काढत असतानाही बराच रक्तस्त्राव होत होता, तो वेळीच थांबविल्याने वळूचे प्राण वाचू शकले. पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी सुरक्षितस्थळी ठेवण्यात आले आहे. हल्लेखोरावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्राणिमित्रांनी पोलिसांकडे केली आहे.