आटपाडी तालुक्यात कायमच्या दुष्काळावर टेंभूने केली मात!

स्व.अनिल बाबर यांना सांगली जिल्ह्यामध्ये महत्वपूर्ण असलेल्या टेंभू योजनेचे जनक म्हणून ओळखले जाते.  शिंदे गटाचे आमदार स्व. अनिल बाबर यांनी टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न केले. स्व.अनिल बाबर यांना सांगली जिल्ह्यामध्ये महत्वपूर्ण असलेल्या टेंभू योजनेचे जनक म्हणून ओळखले जाते. आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी आल्याने कायमस्वरुपी दुष्काळाचा कलंक पुसला गेला.

मुख्य कालव्याच्या गेटमधून ओढापात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा सर्वाधिक उपयोग शेतकऱ्यांना झाला आहे. आटपाडी तालुक्यात प्रथम सन 2024 ला टेंभू योजनेचे पाणी धावडवाडी येथे स्थानिक ओढापात्रात सोडण्यात आले. यापुढे मुख्य कालव्याची कामे अपूर्ण होती. इथपर्यंत पाणी सोडण्यासाठी आटपाडी तालुक्यासह सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मोठा रेटा लावण्यात आला होता. यासाठी पाणी संघर्ष चळवळ व श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मोठे काम करण्यात आले.

त्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने स्थानिक ओढापात्रात पाणी सोडून आटपाडी तालुक्यातून सांगोला तालुक्यातील बुध्याळ तलावात सोडण्यात आले. तदनंतर राहिलेली मुख्य कालव्याची कामे झटपट करून तालुक्यातील सर्वच कालवा पूर्ण झाला. आटपाडी तालुक्यात मुख्य कालव्यावर स्थानिक ओढापात्रात सोडण्यात येण्यासाठी 18 गेट बसवण्यात आले आहे.
तालुक्यात 13 साठवण तलाव आहेत. प्रत्येक गावात चार ते पाच असे गावाच्या पाणलोट क्षेत्राच्या दिशेने पाझर तलाव व मोठ्या ओढ्यांना सिमेंट बंधारे आहेत. योजनेचे पाणी सोडण्यात आल्यानंतर कधी दोन महिने, तर कधी चार महिने मुख्य कालव्यास राहते. त्यामुळे पाण्याची अडचण शेतकऱ्यांना येत नाही. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुक्यात असणारे बंधारे भरून घेण्यात येतात.


योजनेचे पाणी आल्यापासून स्थानिक ओढापात्रांना पाणी वाहते झाले आहे. पाऊस कमी झाला तरी शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासत नाही.टेंभू योजनेचा सर्वात मोठा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांनाही झाला आहे. योजनेच्या पाण्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांनी बागायत क्षेत्र वाढवण्यास सुरुवात केली आहे.