बैलगाडा शर्यतीचा शनिवारी थरार….

कासेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमंदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक व कासेगाव ग्रा.पं. सदस्य अतुल लाहीगडे यांच्या संकल्पनेतून कै.शरद लाहीगडे (आण्णा) फाउंडेशन व कासेगाव बैलगाडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जयंत केसरी ओपन बैलगाडी शर्यत पर्व दुसरे शनिवारी (दि.१७) रोजी कासेगाव येथे होणार आहेत.

अखंड भारतातून अनेक बैलगाडा चालक मालकाने आपल्या नावाची नोंद ऑनलाईन पद्धतीने केली असल्याची माहिती अतुल लाहीगडे यांनी दिली.मागील वर्षी जयंत केसरी च्या स्पर्धा चांगल्या गाजल्या.जयंत केसरी ओपन बैलगाडी शर्यत पर्व दुसरे शनिवारी १७ फेब्रुवारी २०२४ ला संपन्न होत आहे.

या शर्यतीत पाहिले बक्षिस १ बी एच के प्लॅट ठेवले असून चार चाकी गाड्या किंवा आर्थिक बक्षीस न देता प्रत्येक शेतकऱ्याचं किंवा बैलगाडी मालकाचे आपल्या स्वतःचे घर असण्याचे एक स्वप्न असतं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम या बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून आपण करत असल्याचे भावनिक मत आयोजक अतुल लाहीगडे यांनी सकाळ कडे व्यक्त केले.