धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे इचलकरंजी येथील पंचगंगा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले. पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. मंगळवारी सायं. ६.३० वाजता पाणी पातळी ५४.६ फुटावर पोहचल्याने खबरदारी म्हणून जुन्या पुलावरील वाहतुक दुसऱ्यांदा बंद करण्यात आली. इचलकरंजी येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे जुन्या पुलाला घासू लागले. कोल्हापुरी इचलकरंजी शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये शनिवारी आणि रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. परंतु सोमवार आणि मंगळवार पावसाने विश्रांती घेतली आहे.
रविवारी 46 फुटावर असणारी पाणीपातळी ही सोमवारी सायंकाळी आठ फुटाने वाढून 54 फुटावर पोहोचली होती. सध्या पावसाने सर्वत्र विश्रांती घेतली असली तरी नदीच्या पाणीची पातळीमध्ये संतगतीने वाढ होत असून मंगळवारी सकाळी पाणीपातळी 55 फुटावर गेल्यामुळे पाणी जुन्या पुलाला खाली घासू लागले आणि त्यामुळे खबरदारी म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. परंतु मंगळवारी सायंकाळी पातळी उतरल्याने रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.