विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास दोन महिन्याचा अवधी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांना पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्थानिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूर दौऱ्यावर आले होते.
त्या दौऱ्यात हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळे या मतदारसंघातून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, आ. रामचंद्र साळे, स्व.आ.भारत भालके यांना राष्ट्रवादीतून आमदार होण्याची संधी मिळाली.
सध्या या मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य राहिल्यामुळे महाविकास आघाडीतून राहुल शहा यांना उमेदवारी संतभूमी असलेल्या मंगळवेढ्याला न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात नमूद करण्यात आली. निवेदनावर शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी,तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील,माणिक गुंगे, पंडित गवळी सुरेश कट्टे ,काशिनाथ सावजी, धनाजी चव्हाण ,मुजफर काझी, संतोष रंधवे,स्मिता अवघडे, संगीता कट्टे, नागेश राऊत, लव्हाजी लेंडवे,यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.