सांगोला बंद व निषेध मोर्चा! आरपीआय (आ) कडून सांगोला पोलीस निरीक्षक यांना निवेदन

परभणी येथे संविधान विटंबना प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. सदर बंदला सांगोला शहर व तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक बांधवांनी सोमवारी प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवले. तसेच यावेळी बौद्ध व बहुजन बांधवांनी निषेध मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले.परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या इतर मागणीसाठी सांगोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) यांच्यावतीने जाहीर निषेध करून घोषणा देत सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराया खणदाळे यांना निवेदन देण्यात आले.