आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद शेठ पडळकर यांनी खानापूर मतदारसंघात जोरदार यंत्रणा उभे केले आहे. लाडके बहीण योजना घराघरात पोहोचवण्यासाठी भाजपने जबरदस्त मोहीम राबवली आहे. योजना घराघरात पोहोचवण्यासाठी पडळकर बंधूंच्या माध्यमातून तब्बल दहा गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
महिलांना त्यांच्या कामातून त्यांच्या व्यापातून कोठेही बाहेर पडता येत नाही कामाच्या ठिकाणी जातात येत नाही तसेच सर्वर डाऊन असल्यामुळे अनेक महिलांचे काम होत नाही त्यामुळे त्यांना हेलपाटे घालावे लागत आहेत. त्यासाठी पडळकर बंधूंकडून दहा गाड्यांचे आज उद्घाटन करण्यात आले. म्हणजेच ह्या दहा गाड्या वाड्यावर, गल्लीबोळात जाऊन महिलांची येण्या जाण्याची सोय करण्यात येणार आहे.
8660004726 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास पडळकर यांनी उपलब्ध केलेली गाडी थेट दारात येणार आहे. युवा नेते ब्रह्मानंद शेठ पडळकर यांनी ही माहिती दिली आहे.