Microsoft चे सर्व्हर डाऊन! जगभरात हाहाकार

जगभरात Microsoft चे सर्व्हर बंद झाल्याने एकच हाहाकार माजला आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरातील अनेक बॅंक, आयटी, मीडिया एअरलाईन विस्खळीत झाली आहे. याचा भारताला मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचं दिसून येत आहे.विंडोज सुरु होण्यासाठी अजून ५ ते १० तास लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Microsoft चे सर्व्हर ठप्प झाल्यानंतर आता केंद्र सरकार Microsoft अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं समजत आहे. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून देखील सातत्याने याबाबतची अपडेट घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे.