पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक :सयाजी शिंदे ‘चला सावली पेरूया’ उपक्रम

इस्लामपूर पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वृक्षलागवडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये झाड लावण्याची आणि त्याचे संगोपन करण्याची वृत्ती विकसित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरणप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.सांगली जिल्हा परिषद आणि सह्याद्री देवराय यांच्या वतीने येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या मैदानावर बियांपासून रोप तयार करण्याच्या

‘चला सावली पेरूया’ अभियानाचा प्रारंभ शिंदे आणि जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आला. वाळवा तालुक्यात विद्यार्थ्यांकडून ७२ हजार रोपे तयार करून घेण्याचा मानस आहे. तृप्ती धोडमिसे यांनी या उपक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. आबासाहेब पवार यांनी स्वागत केले. गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अॅड. धैर्यशील पाटील, मोहन गायकवाड, प्राचार्य एस. एल. पाटील उपस्थित होते.