इस्लामपुरात तीन दिवसीय नाट्यउत्सवाचे आयोजन……

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलन निमित्त इस्लामपूर शाखेच्या वतीने दिनांक 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान राजारामबापू नाट्यगृहा तीन दिवसीय नाट्यउत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निमंत्रक प्रा. शामराव पाटील यांनी दिली. ते म्हणाले , शनिवारी दिनांक 5 ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवाचे उद्घाटन होईल, यावेळी बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष अभिनेत्री नीलम शिर्के -सामंत ,आमदार मानसिंगराव नाईक ,प्रतीक पाटील यांच्यासह नाट्य परिषदेतील विविध मान्यवर उपस्थित राहतील.