Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण थोड्याच वेळात सादर करतील बजेट

मोदी 3.0 सरकारचा हा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आहे. अवघ्या काही तासात निर्मला सीतारमण या बजेट सादर करतील. सकाळी 11 वाजता अर्थमंत्री केंद्रीय बजेट सादर करतील. त्याविषयीची संपूर्ण तयारी झाली आहे. यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर केले होते. त्यावेळी त्यांनी पूर्ण अर्थसंकल्पात भारत 2047 चे चलचित्र असेल, रोडमॅप असेल हे स्पष्ट केले होते. या बजेटकडून संपूर्ण देशवासीयांना मोठ्या अपेक्षा आहे. मध्यमवर्ग, शेतकरी आणि कष्टकऱ्यांना सरकारकडून मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निर्मला सीतारमण यांचे हे सलग 7 वे बजेट आहे. हा एक विक्रम असेल. आतापर्यंत कोणत्याही अर्थमंत्र्यांने सलग बजेट सादर केलेले नाही. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी 6 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यापूर्वी सीतारमण यांनी 2019 आणि 2024 मध्ये दोन अंतरिम बजेट आणि चार पूर्ण बजेट सादर केले आहेत.

आज अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण डीडी न्यूजवर पाहता येईल. याशिवाय तुम्ही डीडी नॅशनलवर थेट प्रक्षेपण पाहू शकता.  तुमच्या फोनवर लाईव्ह टेलिकास्ट पहायचे असेल, तर तुम्ही ते डीडी न्यूजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता.केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणांचे सर्व तपशील सरकारद्वारे अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जातील. www.indiabudget.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला तुम्ही हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये बजेट दस्तऐवज पाहू शकाल. हे PDF स्वरूपात उपलब्ध असतील, जे तुम्ही डाउनलोड, पाहू आणि वाचू शकता.