सांगलीत लष्कराच्या जवानांनी वाचवले अनेकांचे प्राण….

कर्नाळ रस्त्यासह परिसरात पुराचे पाणी आले आहे. त्याच परिसरातील एका घराभोवती पाण्याने वेढा दिला होता. जिवाच्या आकांताने लोक मदतीच्या प्रतीक्षेत होते. तेवढ्यात लष्कराचे बोट त्याठिकाणी आली.क्षणात पाच जवानांनी पाण्यात उड्या घेतल्या. काही मिनिटातच तेथील नागरिकांना सुरक्षितपणे बोटीत आणले आणि सुरक्षितस्थळी नेले.

काल सायंकाळी पाचच्या सुमारास लष्कराचं हे प्रात्यक्षिक यशस्वी झालं. यावेळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, एनडीआरएफचे पथक, अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्यासह फौजफाटा होता. लष्कराच्या त्या मदतकार्याचा थरार तमाम सांगलीकरांनी पाहिला आणि संभाव्य पूरपरिस्थितीत लष्कर सांगलीकरांच्या सोबत असल्याची भावना यानिमित्ताने समोर आली.