सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या लाडक्या बच्चू भाऊंना पाठिंबा देण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या जनअक्रोश मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सुतार यांची शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे.
शुक्रवारी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मोर्चासाठी सुनील भाऊंनी जिल्ह्यात जंगी नियोजन केलेले आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते बच्चू भाऊंना पाठिंबा देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उद्या गुरुवारी छत्रपती संभाजी नगरकडे रवाना होणार आहेत.