लक्झरी बसची दुचाकीला पाठीमागून धडक! पती-पत्नी जागीच ठार…

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील मळद येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या लक्झरी बसणे धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी दोघेही जागीच ठार झाले.हा अपघात रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला.

मळद येथील दत्तात्रय गंगाधर यादव व त्यांची पत्नी सुमन यादव हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना घागरेवस्ती जवळील दुभाजकाच्या ठिकाणी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी पाठीमागून सोलापूर बाजूकडून येणाऱ्या लक्झरी बसने जोरात धडक दिल्याने दत्तात्रय गंगाधर यादव व त्यांची पत्नी सुमन यादव यांचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला.