सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार संजय पाटील आहेत. पाटील पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, भाजपकडूनच तिकीट मिळवण्यासाठी आता चुरस वाढली आहे.
कारण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पक्षाकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी केली आहे.
लोकसभेसाठी निवडणूक उमेदवारी मागितली आहे. केवळ उमेदवारी मागत नसून पक्षाने संधी दिल्यास जिल्ह्याचे व्हिजन घेऊन निवडणूक ताकदीने लढविली जाईल, अशी भूमिका माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी स्पष्ट केली. रांजणीतील ड्रायपोर्ट झाला पाहिजे, जिल्ह्यात फळबागशेती वाढत असल्याने ड्रायपोर्टच्या अडचणी सोडविण्याची गरज आहे. याशिवाय जिल्ह्यात विमानतळ गरजेचे असून त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, देशमुख यांच्या या निर्णयाने विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यासह भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र दिसते.