पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ऑगस्टपर्यंत राज्यातील अमरावती, वर्धा, नागपूर, अकोला, वाशिम, अचलपूर, सिंदखेडराजा, जालना, बुलढाणा, वैजापूर, अकोट, सिल्लोड, नाशिक, मालेगाव, जळगाव, इगतपुरी, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर सहित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे पण आता या चालू महिन्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल असा अंदाज यावेळी पंजाब रावांनी व्यक्त केला आहे.
डख यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात सहा आणि सात ऑगस्टला पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात कडक ऊन पडणार असा अंदाज आहे. या काळात पावसाची उघडीप राहील पण लगेचच 8 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा पुन्हा एकदा जोर वाढण्याची शक्यता आहे.