सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. प्रत्येक पक्षांची आपापल्या परीने मोर्चेबांधणी देखील सुरू झालेली आहे. उमेदवारी बाबत बैठका, चर्चा या बंद पडद्याआड सुरू झालेल्या आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या आठही विधानसभा मतदारसंघात तयारी करीत आहे. या मतदारसंघाचा अहवाल तयार केलेला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तो देण्यात येणार आहे.
सांगली, मिरज आणि खानापूर- आटपाडी या तीन विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असल्याची माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिलेली आहे. ते म्हणाले की, जिल्ह्याच्या आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघात आमच्या मित्र पक्षांचे आमदार आहेत. उर्वरित सांगली, मिरज आणि खानापूर – आटपाडी विधानसभा मतदारसंघावर शिवसेना आपला दावा सांगत आहे.
गत लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही शांत बसलो होतो मात्र राज्यात महाविकास आघाडीत वरिष्ठ पातळीवरून जागा वाटपाचा एकदा निर्णय झाला की त्यानंतर आम्ही शांत बसणार नाही. राज्य पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल एकदा निर्णय झाल्यानंतर पुन्हा दगाबाजी केला तर सर्व हिशोब चुकता करू असा इशाराही विभुते यांनी दिलेला आहे.
