शासनाकडून अनेक नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. जेणेकरून या योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होईल. खानापूर शहरांमध्ये घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी असणारी जुनी वीज महामंडळाची असणारी वीज मीटर बदलून त्या ठिकाणी खासगी कंपनीची स्मार्ट वीज मीटर बसवण्याचा डाव असल्याचा आरोप किसान सभेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अरुण माने यांनी केला आहे.
खानापूरमध्ये जुने वीज मीटर बदलून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवणे चालू आहे. वीज वितरण कंपनीचा खासगीकरण करण्याचा हा डाव असून, हे मीटर बसवल्यास ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट होणार आहे. बिलामध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खानापूर ग्राहकांनी खासगी कंपनीचे मीटर बसवू नये, असे आवाहन माने यांनी केले आहे.
