आमदार शहाजी बापू पाटील यांची समक्ष भेट घेऊन स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी पाठपुरावा करा असे सांगून त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे यापूर्वी ही आपण बोललो आहे व निश्चितपणे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्याचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही.महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस टिकार, पश्चिम महाराष्ट्राचे ज्येष्ठ सल्लागार शिव गोंडा खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कोषाध्यक्ष गोरख भिलारे, सांगोला तालुका अध्यक्ष रविराज शेटे, सचिव उत्तम काका चौगुले, उपाध्यक्ष अमोल बोत्रे, संगीता चौगुले, दत्तात्रय पवार इ. शिष्ट मंडळ आमदार शहाजी बापू पाटील याची भेट घेतली .
Related Posts
उद्या आमदार शहाजीबापू पाटील यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने सत्कार!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा चबुतरा बांधकामासाठी जयंती उत्सव मंडळाने आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती. आमदार शहाजीबापू…
सांगोला तालुक्यात एल. पी. जी गॅस अनधिकृत वापराबाबतची तपासणीसाठी धडक मोहीम
सांगोला तालुक्यात एल. पी. जी गॅस संदर्भात अनधिकृत वापराबाबतची तपासणी करणेसाठी विशेष धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी…
कटफळ येथील युवा कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील…