सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्ष प्रयत्नशील असलेला पाहायला मिळत आहे. उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे तसेच अनेक उमेदवारांनी आपापल्या मतदार संघामध्ये जोरदार हालचाली देखील सुरू केलेल्या आहेत जसजसे विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तस तसेच राजकीय हालचालींना वेग आलेला आपणाला दिसून येत आहे अशातच
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या दृष्टीने दिल्ली येथे मल्लिकार्जुन खारघे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली.
याच दरम्यान काँग्रेस नेते विश्वजीत कदम व खासदार विशाल पाटील यांनी संजय राऊत यांच्या मध्यस्थीने उद्धव ठाकरे यांच्याशी दिल्ली येथे चर्चा केली. त्यामध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघाबाबत खल झाल्याचे बोलले जात असून काँग्रेसचे खानापूर मतदार संघावर कोणतेही दावा केल नसल्याचे चर्चेला जाऊ लागले.
खानापूर मतदारसंघातून उत्साही काँग्रेस विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जावी अशी जोरदार मागणी केली होती. परंतु उद्धव ठाकरे विश्वजीत कदम विशाल पाटील यांच्या चर्चेमध्ये खानापूर मतदारसंघाबाबत काँग्रेसने मागणी केली नसल्याचे चर्चिले जाऊ लागल्याने जीतेश कदम समर्थकांचा हिरमोड झाला. यापूर्वी खानापूर मतदारसंघातून शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरती 2014 व 2019 च्या निवडणुकीत दिवंगत आमदारांनी अनिलभाऊ बाबर यांनी विजय संपादन केला होता यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व शिवसेना शिंदे गट यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच जिल्ह्यातील विधानसभेच्या चार जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने त्यांचा ही खानापूर मतदारसंघातील आग्रह असल्याचे सूत्रांकडून समजते. महायुती मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे इच्छुक असले तरी त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे शिवसेना शिंदे गटाकडून ठामपणे चर्चेला जात आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी सुहास बाबर यांचे नाव निश्चित मानले जात असून वैभव पाटील नेमकी काय भूमिका घेणार? याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.