दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस म्हणून साजरा करतात. महिला दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या दिवशी भारतात अनेक ठिकाणी महिलांना मोफत प्रवेश दिला जातो. तुम्हीही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर महिला दिनी नक्की जा.
खरं तर, 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाने महिलांना खास भेट दिली होती. या दिवशी केवळ भारतीय महिला पर्यटकांनाच नाही तर विदेशी महिला पर्यटकांनाही या स्मारकांमध्ये मोफत प्रवेश देण्यात आला आहे. तेव्हापासून, दरवर्षी महिला कोणत्याही शुल्काशिवाय भारतातील कोणत्याही स्मारकाला भेट देऊ शकतात.
जर तुम्ही ताजमहाल पाहणार असाल तर आता तुम्हाला 200 रुपये खर्च करण्याची गरज नाही. ताजमहालमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला 50 रुपये मोजावे लागतात. जर तुम्हाला ताजमहालची मुख्य कबर आतून आणि वरून यची असेल तर त्यासाठी तुम्हाला 200 रुपये वेगळे द्यावे लागतील. मात्र आता ते पाहण्यासाठी महिलांना शुल्क भरावे लागणार नाही.
लाल किल्ल्यावर सोमवार ते शुक्रवार प्रति व्यक्ती 60 रुपये प्रवेश शुल्क आहे. याशिवाय शनिवार आणि रविवारी 80 रुपये शुल्क आकारले जाते. मात्र आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांकडून प्रवेश शुल्क आकारले जात नाही.
कुतुबमिनार येथे भारतीयांसाठी प्रवेश शुल्क 35 ते 40 रुपये प्रति व्यक्ती आहे. याशिवाय परदेशींकडून ५०० रुपये घेतले जातात. परंतु आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कुतुबमिनारमध्ये सर्व महिलांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.