किणी टोल केंद्रापासून वीस किलोमीटरच्या त्रिजेतील गावातील चार चाकी वाहन मालकांना नाममात्र शुल्कात येजा करन्यास सवलत देण्यात आली आहे. रस्ते प्राधिकरणाच्या या निर्णयाने वाळवा तालुक्यातील साधारण वीस गावांना त्याचा लाभ होऊ शकतो. पथकर केंद्रापासून सभोवताली 19 ते जास्तीत जास्त वीस किलोमीटर अंतर गृहीत धरले जाणार आहे. त्यामध्ये फक्त घरगुती प्रवासाचे चार चाकी वाहन समाविष्ट आहे.
गाडीचे नोंदणी पुस्तक, आधार कार्ड व तीनशे पंधरा रुपये मासिक शुल्क टोल केंद्रात देऊन पास मिळेल. 20 किलोमीटर परिघातील घरगुती वाहन मालकांना मानसिक मासिक पास देण्यात येईल अशी माहिती किनी टोल व्यवस्थापकांकडून देण्यात आली.
19 ते 20 किलोमीटर अंतराच्या सवलतीमुळे वाळवा तालुक्यातील कनेगाव, भरतवाडी, तांदुळवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी, कोरेगाव, भडकंबे, नागाव, ढवळी, शिगाव, बागणी, कुंडलवाडी, ऐतवडे खुर्द, कुरळप, वशी, लाडेगाव, इटकरे, येडेनिपाणी, गोटखिंडी, बावची या गावांना लाभ अपेक्षित आहे प्रवासी व मालवाहतूक वाहनास सवलतीचा लाभ मिळणार नाही.