गोपीचंद पडळकरांची विशाल पाटील यांच्यावर टीका…..

सांगलीती ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा झाला.खासदार विशाल पाटील इथे मेळावा घेऊ नका असे म्हणत होते, दोन चार महिन्यातच विशाल पाटील यांना लांब मिशा आल्या, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी सगेसोयरेला विरोध केला. गोपीचंद पडळकर म्हणाले की, प्रस्थपितांच्या बालेकिल्यात आज ओबीसी महा एल्गार मेळावा पार पाडत आहे. आमचा विरोध आहे म्हणून एकत्र आलो नाही. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहेत, त्याला ओबीसी नेत्यांचा विरोध नाही. आमचा विरोध सगे-सोयरे अधिसूचनेला आहे.