इस्लामपुरात अपघातात ८ जखमी वाहनांचे मोठे नुकसान

जखमीत तिघा पादचाऱ्यांचा समावेश कार व छोटा टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन रस्त्याकडेने चाललेल्या तिघांसह आठजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळी इस्लामपूर बोरगाव रस्त्यावर येथील एका हॉटेलसमोरील चौकात झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.स्वराज संदीप नवले (१०), वैशाली संदीप नवले (३५, सर्व रा. इस्लामपूर), राम तानाजी नांगरे (३२), शंकर महादेव नांगरे (९), सौरभ शंकर जाधव (२४), संदेश संजय जाधव (२४, सर्व रा. गाताडवाडी), विष्णू दादू आवळे (६६, रा. करंगुली) अशी जखमींची नावे आहेत.

टेम्पो ( एम एच १० एक्यू विराज संदीप नवले (वय ८), १५३३) हा लोखंडी सळया घेऊन इस्लामपूरहून बोरगावकडे चालला होता, तर कार (एम एच १० सी ए १९६५) ही रिंगरोडकडून महादेवनगरकडे निघाली होती. या चौकात दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत टेम्पोचा हौदा तुटून बाजूला पडला, तर टेम्पोतील सळया रस्त्याकडेने चाललेल्या तिघांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले.