कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुका हा महसुली उत्पन्नसह विस्ताराने अडीच ब्लॉगचा आहे. हातकणंगले तालुक्याकडे सर्वाधिक महसूल मिळवून देणारा तालुका म्हणून पाहिले जाते. या उत्पन्नात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे तलाठी कार्यालय दुर्लक्षित राहिलेले आहेत म्हणजेच येथील ज्या काही इमारती आहेत या इमारती पूर्णतः मोडकळीस आलेल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सरकारी दप्तर हे खराब होऊ नये त्यामुळे अन्य ठिकाणी हे दप्तर हलवण्यात येते.
हातकणंगले तालुक्यातील तलाठी कार्यालयाच्या नव्या इमारतींना अखेर मुहूर्त लागलेला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी प्रशासकीय इमारतीसह गाव पातळीवरील सरकारी इमारती बांधकामाचा निर्णय घेतलेला आहे आणि याच संकल्पनेतून तलाठी कार्यालय उभे करण्यात येत आहेत.
हातकणंगले तालुक्यामध्ये 22 तलाठी कार्यालय बांधकाम साठीच्या निविदा भरण्याचा अखेरचा दिवस हा 23 ऑगस्ट असून त्याच दिवशी प्राप्त निविदा उघडण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात हातकणंगले तालुक्यातील 22 गावातील तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आलेले आहे. यासाठी २ कोटी 73 लाख 90 हजारांचा निधी मिळालेला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदाही प्रसिद्ध केलेली आहे.
यामध्ये हातकणंगले तालुक्यातील तारदाळ, खोतवाडी, चावरे, सावर्डे, तळसंदे, अतिग्रे,हातकणंगले, रेंदाळ, तळंदगे, मानगाव, शहापूर, कोरोची, लाटवडे, अंबप, टोप, खोची,रुकडी, पट्टणकोडोली, भादोले, घुणकी, वाठार तर्फ वडगाव या गावांचा समावेश होतो.