नागावात ट्रान्सफॉर्मरमधील इलेक्ट्रीक साहित्यांची ९ लाखांची चोरी

हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील नागाव विकास सोसायटीचे पाणीपुरवठा विभागाचे जॅकवेल शिरोली एमआयडीसी येथील स्मैक भवन जवळ पंचगंगा नदीकाठावर आहे. सध्या पावसाळा चालू असल्यामुळे व पूर परिस्थितीमुळे जॅकवेल बंद होते. बरेच दिवस कामगारांना याठिकाणी जाता आले नव्हते,तरी १४ ऑगस्ट रोजी सकाळी संस्थेचे कामगार मेंटेनन्स रिपेअरी साठी जॅकवेल वर गेले होते. यावेळी त्यांना ट्रान्सफार्मर उचकटलेल्या अवस्थेत दिसला.

ट्रान्सफार्मर जवळ जाऊन बघितले असता ट्रन्सफार्मर मधील इलेक्ट्रिक साहित्याची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ विकास सोसायटीच्या पदाधिकाय कळविले. घटना समजतात नागाव विकास सोसायटी पदाधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यामध्ये ५०० केव्ही, ११ केव्ही, ४३० व्होल्टेज ट्रान्सफार्मर मधील इलेक्ट्रिक साहित्याची चोरी झाल्याचे आढळून आले.

या चोरीमध्ये कॉपर वायर अंदाजे ३०० किलो, ट्रान्सफार्मर ऑईल ४१८ लिटर, इन्सफार्मर इन्सुलेशन स्टॅम्पिंग असे अंदाजे ९ लाख १८ हजार सहाशे रुपयांची चोरी झाल्याची तक्रार नागाव विकास सोसायटीने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.