हेर्लेत जुगार कारवाई; आठजणांवर गुन्हा

हातकणंगले,  हेर्ले येथील स्मशान भूमिच्या शेडमध्ये तीन पानी जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर हातकणंगले पोलीसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून नऊ हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल व ३१४० रुपयांची रोख रक्कम असा १२ हजार १४० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतची फिर्याद पो.कॉ. विकास सुगंध घस्ते यांनी दिली आहे.

 महेश बाळासो इंगळे, संदिप बाळू लोखंडे, गणेश मजिद लोखंडे, राहुल बाबासो कोळेकर, शरद मारूती मोहीते, संग्राम संभाजी ढाले, राजु सिकंदर उस्ताद, शमशुद्दीन निजाम बारगीर (सर्व रा. हेर्ले) अशा आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.