वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे आमच्या घरासमोर व परिसरात उघडपणे बेकायदेशीर दारू विकली जाते. आमच्या मुलाचे लग्न जमविण्यासाठी पाहुणे आले होते. त्याचवेळी दारुड्यांचा धिंगाणा सुरू होता.. अशाने आमच्या मुलांची लग्ने होईनात, या दारुअड्ड्यांचा बंदोबस्त करा, अशी कळकळीची मागणी महिला ग्रामसभेत एका वृद्धेने केली.
दारूने अनेकांची घरे उद्ध्वस्त होऊ लागली आहेत. घरासमोर व परिसरात बेकायदेशीर दारू विक्री पोलिसांच्या आशीर्वादाने होत असल्याचा आरोप वत्सला बाबर यांनी केला. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दीपाली पाटील होत्या.
उपसरपंच प्रताप थोरात यांनी स्वागत केले. ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण कोळी यांनी अहवाल वाचन केले. यावेळी लालासाहेब थोरात, राजश्री एटम, सुनंदा पाटील, अश्विनी पाटील, जयश्री पाडळकर, अश्विनी लोंढे, जयश्री घारे, प्रकाश पाटील, दीपक शिंगटे, राहुल नांगरे उपस्थित होते.