सध्या अनेक भागातील यात्रांचे उत्सव सुरु आहेत. यात्रेनिमित्त परगावाहून लोक गावाकडे परतत असतात. यात्रेनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जातात. वाळवा तालुक्यातील बहे येथील विशाळी यात्रा दि. २९ व ३० जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. बुधवारी (२९ ला ) पौष अमावस्येला यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे. बुधवारी पहाटे अभिषेक, धार्मिक विधी पार पडतील. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले राहील. यात्रेत खेळणी, खाद्य पदार्थांचे स्टॉल येत असतात. भाविकांनी दर्शनाचा व यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बहे ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
वाळवा तालुक्यातील बहेत विशाळी यात्रेनिमित्त विविध उपक्रम
