गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे, याकरिता राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. यासाठी सर्व मंडळाने दि. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात
आले.