केंद्र सरकार लवकरच करणार मोठी घोषणा!

केंद्र सरकार लवकरच एक मोठी घोषणा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या माहितीनुसार, केंद्र सरकार जुनी पेन्शन योजनेवर मोठी घोषणा करू शकते. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांची ही मागणी अजूनही सुरूच आहे. सरकारने 2004 साली ही योजना बंद केली होती, त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू होईल की नाही याबाबत अधिकृतपणे काहीही सांगता येणार नाही.

तर दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार आणखी एक मोठी भेट देणार आहे, ज्याची चर्चा जोरात सुरू आहे. केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करू शकते, त्यानंतर पगारात बंपर वाढ होणार हे निश्चित मानले जात आहे.