सांगोला तालुक्यामध्ये पाण्याची खूपच टंचाई जाणवते. सांगोला तालुका हा दुष्काळी भाग म्हणून देखील जगजाहीर आहेच.
सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शेतकऱ्यांची खूपच आग्रही मागणी होती. गेल्या पाच वर्षात सिंचनाचे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी मतदार सर्व योजनांना कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने सिंचनाच्या योजना मार्गी लागलेल्या आहेत.
अशातच सांगोला तालुक्याला वरदायिनी ठरलेल्या टेंभू, म्हैसाळ, निरा उजवा कालवा स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची उर्वरित कामे मार्गी लागावीत शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने जलसिंचनाचे प्रकल्प मार्गी लागल्याने शेतीचा पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटलेला आहे.
शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन टेंभू योजनेतून पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. उद्या म्हणजे शुक्रवारी 23 ऑगस्ट रोजी कोळा नाला येथून टेंभू योजनेचे पाणी, बुद्धेहाळ तलावात सोडण्यात येणार असून तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिलेली आहे.