राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सध्या सर्वच पक्ष मतदारसंघांची चाचपणी करताना दिसत आहेत.तर दुसरीकडे अनेक नेतेही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यातच आता महाविकासआघाडीचा एक अंतर्गत सर्व्हे समोर आला आहे.
या सर्व्हेत महाविकासाआघाडीत कोणत्या घटक पक्षाला किती जागा मिळणार याबद्दलही माहिती समोर आली आहे.महाराष्ट्रात महाविकासआघाडीकडून अंतर्गत सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत राज्यात महाविकासआघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या सर्व्हेनुसार काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत 85 जागांवर विजय मिळेल, असे बोललं जात आहे. तर पवार गटाला 55-60 आणि ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.