सांगोला बसस्थानकावर रोड रोमियोंची धरपकड करून नऊ ते दहा जणांवर सपोनी रुपाली उबाळे यांनी कारवाई केल्याने विद्यार्थिनी व महिलांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. सांगोला शहरात ग्रामीण भागातून शिक्षणानिमित्त दररोज हजारो मुली एसटीने येजा करतात. या मुलींना शहर परिसरातील रोड रोमियोंकडून हा त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोनी. भीमराव खनदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी रुपाली उबाळे मॅडम, पोकॉ.शिंदे, चालक खटकाळे व होमगार्ड यांच्या पथकाने एसटी स्टँड परिसरात धडक कारवाई करून 9 ते 10 रोड रोमियोंना पोलीस ठाण्यात आणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 110, 117 अन्वये कारवाई करून समज देण्यात आली. या कारवाईमुळे विद्यार्थिनींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.