अनेक पालक हे त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करत असतात. सध्याची महागाई पाहता मुलांचे शिक्षण, त्यांचा खर्च आणि लग्न या सगळ्यांसाठी आतापासूनच बचत करून गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. देशातील सर्वात मोठी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये मुलींसाठी विशेष पॉलिसी योजना सुरू करू शकता. यामधून तुम्हाला खूप चांगला परतावा देखील मिळतो.आई-वडिलांना नेहमीच मुलींच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्चाचे टेन्शन असते.
परंतु आता एलआयसी कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadan Policy) ही मुलींच्या उज्वल भविष्यासाठी खूप चांगला पर्याय ठरू शकते. या पॉलिसीमध्ये तुम्ही तुमच्या मुलीसाठी 22.5 लाख रुपयांचे जमा करू शकता. याचप्रमाणे याला कर सवलत आणि कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहेत. जर तुमच्या मुलीचे वय देखील एक ते दहा वर्षाच्या दरम्यान असेल, तर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.
एलआयसीची कन्यादान पॉलिसी ही मुदत विमा आहे. या पॉलिसीचा कालावधी 13-25 वर्षांचा आहे.यामध्ये, तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक यापैकी प्रीमियम पेमेंटसाठी कोणताही एक पर्याय निवडू शकता.
मॅच्युरिटीच्या वेळी, तुम्हाला विम्याची रक्कम + बोनस + अंतिम बोनससह एकूण रक्कम मिळते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुलीच्या वडिलांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी असावे.
एलआयसी कन्यादान पॉलिसीचे फायदे
गुंतवणूकदाराला LIC ची कन्यादान पॉलिसी घेतल्याच्या तिसऱ्या वर्षीच कर्जाची सुविधा मिळते.पॉलिसीच्या दोन वर्षानंतर, गुंतवणूकदाराला ते सरेंडर करण्याचा पर्याय असतो.
या पॉलिसीमध्ये वाढीव कालावधीत प्रीमियम भरण्याचा पर्याय आहे. यामध्ये, जर तुम्ही कोणत्याही महिन्यात प्रीमियम भरला नाही, तर तुम्ही विलंब शुल्काशिवाय पुढील 30 दिवसांत प्रीमियम भरू शकता.कन्यादान पॉलिसीमध्ये प्रीमियम भरल्यावर 80C अंतर्गत कपातीचा लाभ उपलब्ध आहे.कलम 10D अंतर्गत परिपक्वता रकमेवर कर लाभ देखील उपलब्ध आहे.
तुम्ही एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये २५ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला वार्षिक ४१,३६७ रुपये गुंतवावे लागतील. याचा अर्थ प्रीमियम दरमहा सुमारे 3,447 रुपये असेल. 25 वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी, तुम्हाला फक्त 22 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. आता मॅच्युरिटीनंतर तुम्हाला सुमारे 22.5 लाख रुपयांचा नफा मिळेल.