स्मारक उभारणीसाठी मंजुरी देण्याची कार्यवाही तात्काळ करावी: आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे. महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य स्मारक उभारण्यासाठी माझ्यासह शिवप्रेमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांची स्मारक समितीची बैठक तातडीने आयोजित करावी तसेच स्मारक उभारणीसाठी मंजुरी देण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्राद्वारे व दूरध्वनी वरून जिल्हाधिकाऱ्यांकडे केले आहेत.