आजवर अनेक नेते मंडळींनी भाषणे तसेच आश्वासने दिलेली आपण पाहिलेच आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी जनतेच्या व्यथा जाणून घेऊन त्यांच्या समस्या मार्गी लावणारा पहिलाच नेता गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने माजी आमदार दीपक आबांच्या रूपाने पाहिले असल्याची चर्चा सध्या सांगोला तालुक्यातील नागरिकांमधून सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा सध्या गावभेट आणि जनसंवाद दौरा सुरू आहे. बुधवार दि १० रोजी एखतपूर ता सांगोला येथे शेकडो महिलांच्या उपस्थितीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्य सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला. यावेळी एखतपूर येथील शेकडो महिलांचे या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी लक्ष्मीनगर, अचकदानी, बागलवाडी सोनलवाडी आणि एखतपुर परिसरातील वाड्यावस्त्यांवर जाऊन जनतेच्या व्यथा तसेच त्यांच्याशी संवाद साधला. यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवार दि १० रोजी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
जनतेच्या समस्या जाणून घेऊन क्षणाचाही विलंब न करता आबांनी त्याच ठिकाणावरून संबंधित प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फोन करून सामान्य जनतेची जी काही रखडलेली कामे आहेत ती कामे तात्काळ पूर्ण करावीत अशा सूचना देखील दिल्या.
