सांगोला- पंढरपूर महामार्गावरील गतिरोधक करावेत अशी मागणी कार्यकारी अभियंता, रस्ते परिवहन व राज्य महामार्ग सोलापूर विभाग यांच्याकडे शाहीर अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे .पंढरपूर मार्गावर वाडेगाव नाका परिसर, जलशुद्धीकरण केंद्र ,फॅबटेक बस स्टॉप या दोन्ही ठिकाणी तीव्र उतारा व वळण असल्याने दोन्ही बाजूकडील वाहने रस्त्याच्या योग्य अंदाज नसल्याने वेगात धावत असल्याने या परिसरात दररोज छोटे-मोठे अपघात होतात या अपघातामध्ये आत्तापर्यंत वर्षभरात नऊ ते दहा नागरिकांना आपल्या अनमोल जीव गमवावा लागला आहे. तरीही एमआरडीसी, महामार्ग विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.
विशेष म्हणजे हा भाग पोलीस विभाग , महामार्ग विभागाने ब्लॅक स्टॉप जाहीर केला आहे, या पुढील काळात अशा घटना टाळण्याकरिता या परिसरात दोन्ही बाजूला रंबलर स्ट्रीप गतिरोधक बसावेत अशी मागणी वाहनधारकातून व नागरिकातून होत आहे तरीही या परिसरात रंबलर प्रतिरोधक तात्काळ बसवावेत .या निवेदनाचे प्रती जिल्हाधिकारीसो ,सोलापूर ,पोलीस अधीक्षक ,सोलापूर तहसीलदार, सांगोला यांनी देण्यात आले आहेत. यावेळी अशोक कामटे संघटनेने पदाधिकारी उपस्थित होते