उद्या खा. डॉ. श्रीकांत शिंदे इचलकरंजीच्या दौऱ्यावर..

सध्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेला आहे. अनेक सभांची मेळावे हे आपापल्या परीने पक्षाने सुरू केलेले आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने टार्गेट केला आहे असे चित्र सध्या दिसून येत आहेत. पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ताकद ही वेगळ्या अर्थाची गेल्या आठ दिवसात कार्यरत झालेली आहे असेही लक्षात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राधानगरी, भूदरगड, उत्तर कोल्हापूर, करवीर या विधानसभा निवडणुका लढवण्याबरोबरच इचलकरंजी विधानसभा निवडणूक लढवायची याचा निर्धार केलेला आहे. पक्षाचे नेते खा. डॉ. श्रीकांत शिंदे हे उद्या म्हणजेच मंगळवारी 3 सप्टेंबरला येथील इचलकरंजीच्या दौऱ्यावर येत आहेत.

आ. प्रकाश आबीटकर, माजी. आ. राजेश क्षीरसागर, माजी. आ. चंद्रदीप नरके, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, आ.डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर किंवा प्रा. चंद्रकांत मोरे यापैकी संभाव्य उमेदवार असतील अशा दृष्टिकोनातूनच यंत्रणा ताकदवर बनविण्यासाठी खा. डॉ. शिंदे यांचा हा दौरा होत आहे.