टेन्शन वाढलं! कोल्हापुरात शरद पवारांची जोरदार राजकीय खलबतं

आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे समजित घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान कोल्हापुरात शरद पवार यांची जोरदार राजकीय खलबतं सुरू आहेत. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे.भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राहुल देसाई राधानगरी भुदरगड मतदार संघातून इच्छूक आहेत.

तर दुसरीकडे याच मतदारसंघातून इच्छुक असलेल्या के पी पाटील आणि ए वाय पाटील यांनी देखील शरद पवार यांची भेट घेलती आहे. राहुल देसाई यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सुद्धा भेट घेतली आहे. काही दिवसापूर्वीच राहुल देसाई यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.