पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०२३ पासून ग्रामीण भागातील विविध विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक गावात जेनेरिक औषध मेडिकल दुकान योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील पहिले दुकान सुरु करण्याचा मान पन्हाळा तालुक्यातील पोखले येथील बलभीम विकास सेवा संस्थेला मिळाला आहे. या दुकानाचे १५ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे.
सामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात औषध मिळावीत म्हणून पंतप्रधानांनी ग्रामीण भागातील प्रत्येक गावात जेनेरिक औषध दुकान योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत सुरु होणाऱ्या पहिल्या दुकानाबाबत पन्हाळा सहायक निबंधक नारायण परजणे यांनी माहिती दिली.
त्या अनुषंगाने फार्मासिटिकल ब्युरो ऑफ इंडियाचे सहायक व्यवस्थापक अनुज तिवारी, कोल्हापूर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे,पन्हाळा सहायक निबंधक नारायण परजणे, व्ही. एस.मठ्ठीमनी, एम. एम. पाटील, एच. डी. खोत यांनी संस्थेला भेट देऊन दुकानासाठी लागणारी जागा, कर्मचारी, फर्निचर व यंत्र सामग्रीची पाहणी केली.