इस्लामपूर, खानापूर- आटपाडी विधानसभा मतदारसंघाची….

राज्यात विधानसभेसाठी महायुतीच्या जागा वाटपाबाबत निर्णय नाही. परंतु शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्यात जनसंवाद दौरा सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ हे दोन विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रडारवर आहेत.

खानापूर आटपाडी मतदारसंघ शिवसेनेचाच असल्याने एकूण तीन मतदारसंघ शिवसेनेला मिळतील, असे गृहीत धरून त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी जनसंवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे. इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, असे मानून जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि गौरव नायकवडी यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी इस्लामपुरात कार्यकर्ता मेळावा आहे.


खानापूर आटपाडी मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेनेचे सुहास बाबर यांनाच
उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनीही निवडणुकीची तयारी केली आहे. मतदारसंघाची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवली आहे.

सुहास बाबर आणि वैभव पाटील यांच्यातील तिढा सुटला नाही तर मतदारसंघावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उमेदवार देण्याची संधी सोडणार नाहीत. एकंदरीत श्रीकांत शिंदे यांचा दौरा म्हणजेच महायुतीकडून जिल्ह्यात कमीत-कमी तीन जागा मिळवण्याची राजकीय खेळी दिसते.