गणेशोत्सव स्पर्धेस ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

सांगली जिल्ह्यात दि. ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता वे याकरिता अर्ज भरण्याची मुदत ५ सप्टेंबरपर्यंत वाढविल्याची माहिती जिल्हास्तरीय गणेशोत्सव पुरस्कार समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

अशोक पाटील म्हणाले, या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे यासाठी या स्पर्धेत भाग घेणास इच्छुक असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेचा अर्ज भरून तो अर्ज ऑनलाइन पध्दतीने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेल आयडीवर दि. ५ सप्टेंबरपर्यंत सादर करावेत.