सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी पाच हजार अभियंते शिक्षण पूर्ण करतात, पण नोकरीच्या निमित्ताने बहुतेकजण परजिल्ह्यातच जातात. दरम्यान, आता सोलापूर जिल्ह्यात कासेगाव, कुंभारी, मोडनिंब, अतिरिक्त चिंचोली या ठिकाणी नवीन एमआयडीसींचे प्रस्ताव आहेत. सोलापूर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंदिरा गांधी पार्क स्टेडिअम आहे, पण विमानसेवा नसल्याने आंतरराष्ट्रीय सामने होण्यास अडचणी आहेत. अनेक उद्योजकांना सोलापुरात यायचे आहे, पण विमानसेवा नसल्याची त्यांची ओरड आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्राच्या ‘उडान’ योजनेतून सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी आता उच्चस्तरीय हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती.
त्यानंतर आता विमानसेवेच्या परवान्यासाठी प्रस्ताव तयार केला जात असून १५ सप्टेंबरपर्यंत तो प्रस्ताव डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडे (डीजीसीए) पाठविला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात महामार्गाची कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर स्मार्ट सिटीतील सोलापूरकरांना आता विमानसेवेची प्रतीक्षा आहे. पुणे, मुंबईतील एमआयडीसी हाऊसफुल झाल्यानंतर सोलापूर शहर- जिल्ह्यात उद्योगवाढीला मोठा वाव आहे. पण, येथे आयटी कंपन्या नाहीत, मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारे व अपेक्षा पूर्ण करणारे नवीन उद्योग नाहीत.
सोलापूर जिल्ह्यात महामार्गाची कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर स्मार्ट सिटीतील सोलापूरकरांना आता विमानसेवेची प्रतीक्षा आहे. पुणे, मुंबईतील एमआयडीसी हाऊसफुल झाल्यानंतर सोलापूर शहर- जिल्ह्यात उद्योगवाढीला मोठा वाव आहे. पण, येथे आयटी कंपन्या नाहीत, मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारे व अपेक्षा पूर्ण करणारे नवीन उद्योग नाहीत.