सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. त्यामुळे राज्यात एकच संतापाची लाट उसळली. फरार झालेल्या जयदीप आपटे आणि चेतन पाटील याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या दोघांची पोलीस कोठडी आज 10 सप्टेंबर रोजी संपत आहे. या दोघांना पण आज न्यायालयात हजर करण्यात येईल. आपटे हा पाच दिवसांपासून तर चेतन हा 10 दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे.
पण या दरम्यान आपटेची नाटकं पाहायला मिळाली.आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलची आज पोलीस कोठडी संपणार आहे. मालवण राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा दुर्घटना प्रकरणी पोलीस कोठडी संपत असल्याने सल्लागार चेतन पाटील याला तिसऱ्यांदा मालवन पोलीस न्यायलायासमोर हजर करणार आहेत. तर घटनेतील मुख्य आरोपी मूर्तिकार जायदीप आपटे याला दुसऱ्यांदा न्यायल्यासमोर हजर करणार आहेत.
चेतन पाटील मागील दहा दिवस आहे पोलीस कोठडीत तर जायदीप आपटे मागील पाच दिवसांपासून पोलीस कोठाडीत आहे.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप तपासात अनेक विसंगती आहे. तसेच आरोपी महत्वाची माहिती लपवत आहे. त्याने तपासात सहकार्य न केल्याने आरोपींना अजून पोलीस कोठाडी देण्याची विनंती पोलीस आज करणार आहेत. त्यामुळे पुन्हा आपटे आणि पाटील याला जेल होते की बेल मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.