देशभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण आहे. अनेक मंडळांमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आहे. तसेच अनेक मंडळांमध्ये आरत्यांसाठी नेते मंडळींची उपस्थिती देखील पाहायला मिळत आहे. अशातच विट्याच्या राजाची आरती मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली.विट्यात मंत्री शंभूराजे देसाई यांचा ताफा दाखल झाला.
विट्याच्या राजाच्या आरती दरम्यान अनिल भाऊंच्या आठवणीने लाडक्या अनिल भाऊंना शोधणारे कार्यकर्त्यांचे डोळे अक्षरशः पानावून गेले. शंभूराजे देसाई यांच्या उपस्थित आणि अनिल भाऊंच्या आठवणीत विट्याच्या राजाची आरती संपन्न झाली. यावेळी त्यांच्या मुलांच्या पाठीशी आम्ही ठाम राहू ही भावना देखील यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केली आहे.