हातकणंगले तालुक्यातील आळतेत भूत गुहेचा देखावा! नागरिकांची प्रचंड गर्दी

सगळीकडे गणेशोत्सवानिमित्त चैतन्यपूर्ण, उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाचा सण आनंदाने साजरा दरवर्षी केला जातो. गावोगावी, गल्लोगल्ली अनेक मंडळे आपापल्या मंडळामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा करतात. सकाळ, संध्याकाळ नित्यनेमाने आरती देखील करीत असतात. तसेच अनेक मंडळांच्या वतीने देखावे देखील केले जातात. देखावे पाहण्यासाठी चहात्यांची मोठी गर्दी देखील होते.

हातकणंगले तालुक्यातील आळते येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने गणपतीनिमित्त धनगर गल्ली येथे भूत गुहेचा देखावा साकारलेला आहे. आळते गावात प्रथमच अशा पद्धतीचा देखावा साकारल्यामुळे नागरिकांनी देखावा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केलेली आहे. घरगुती गणेश विसर्जनपर्यंत हा देखावा सुरू राहणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी हा देखावा पाहण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.