सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंगरगाव यांच्या वतीने उद्या गुरुवारी सायंकाळी ठीक सहा वाजता राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा व राज्यस्तरीय वैयक्तिक डान्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व ग्रामीण भागातील कलाकारांना स्वतंत्र व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भीमराव खंणदाळे उपस्थित राहणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
प्रथम क्रमांकासाठी 11,111 रुपये व ट्रॉफी तर दुसरे 7,777 रुपये व ट्रॉफी तर तृतीय क्रमांकास 5555 रुपये रोख व ट्रॉफी तसेच उत्तेजनार्थ 2222 रुपये व ट्रॉफी बक्षीस देण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.