मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. येचुरी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. सीताराम येचुरी 72 वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते एक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इंफेक्शनने त्रस्त होते. त्यांना 19 ऑगस्टला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या दरम्यान आज दुपारी त्यांचं निधन झालं.सीताराम येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 ला मद्रास (चेन्नईत) एका तेलुगू भाषिक ब्राह्मण परिवारात झाला होता. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य रस्ते परिवहन विभागात इंजिनियर होते. तर त्यांच्या आई कल्पकम येचुरी एक सरकारी अधिकारी होत्या. सीताराम येचुरी यांनी नवी दिल्लीच्या प्रेसिडेंट्स एस्टेट स्कुलमध्ये शिक्षण घेतलं होतं. तसेच त्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या उच्च माध्यमिक परीक्षेत भारतात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाच बीएचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर दिल्लीतील जेएनयू येथे एम.ए. अर्थशास्त्रचं शिक्षण घेतलं होतं. आणीबाणीच्या काळात जेएनयूमधील अटक होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये येचुरी हे देखील होते.
Related Posts
सांगोल्यात पुन्हा मीच आमदार होणार……
सध्या निवडणुकीचे वारे जोर देत आहे. सगळीकडे मोर्चेबांधणीस पक्षांनी सुरुवात ही केलेली आहे. काय झाडी, काय डोंगर ही कॉल रेकॉर्डींग…
कंगाल करणारा शेअर तेजीच्या लाटेवर स्वार, गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ ‘हिरवेगार’
अलीकडच्या काही महिन्यांत फूड डिलिव्हरी कंपनी, झोमॅटोच्या शेअरमध्ये चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी शेअर बाजारात दाखल झालेल्या…
सर्व खाजगी शाळांकरिता १ कोटी ४७ लाखाची बक्षिसे! हातकणंगले न्यूज
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या…