राज्य सरकारचा मोठा निर्णय! सर्व खासगी, सरकारी शाळांमध्ये मराठी विषय असणार सक्तीचा..

राज्यातील खासगी तसेच सरकारी शाळेतील अभ्यासक्रमात मराठी विषय सक्तीचा करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मराठी विषयासाठी श्रेणी नाही तर थेट गुणांकन करा असे निर्देश राज्य सरकारने दिले असून मराठी भाषा सक्तीकडे महत्वाचे पाऊल उचल्ण्यात आले आहे.

याबाबतचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घ्यावीच लागणार आहे. या परीक्षेत मराठी विषयाला श्रेणी देऊन मूल्यांकन न करता मार्क्स देऊन मूल्यांकन केले जाणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मराठी भाषा सक्तीच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले असून शालेय अभ्यासक्रमात मराठी विषय खाजगी तसेच सरकारी शाळेत सक्तीचा करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घ्यावीच लागणार आहे.

या परीक्षेत मराठी विषयाला श्रेणी देऊन मूल्यांकन न करता मार्क्स देऊन मूल्यांकन केले जाणार आहे. इतर माध्यमातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय गांभीर्याने शिकवला जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारकडून ही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 2025-2026 या शैक्षणिक वर्षापासून होणार या नव्या पद्धतीची अंमलबजावणी होणार आहे.